मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

भ्रष्टाचार

स्वार्थासाठी सगळ्या
गुळाभोवती मुंग्या
सत्तेपुढे टाकतात
सर्वच लोक नांग्या

ज्याची काठी त्याची म्हैस
हीच खरी म्हण
सत्ते पुढे नाही चालत
कुणाचेही शहाणपण

इमानदारीची दुनिया
आता राहीली नाही
भ्रष्टाचाराशिवाय तर
काहीच मिळत नाही

भ्रष्टाचाराचे बाळकडू
आता गर्भातच मिळते
सारी दुनिया तर
आता भ्रष्टाचारातच जगते

            

सु-निल पवार

ज्यांनी जातीयतेला मुळातून उखडले
त्याच महापुरूषांना यांनी जातीत जखडले
पाश त्यांनी अनिष्टांचे ज्ञानानी जे तोडले
त्यांच्याच ज्ञानावर कंटकांनी ताशेरे ओढले
जातीयतेची त्यांनी नवीन रूप पहिले
स्वार्थासाठी त्यांना जातीय्नुरूप बनविले
हृदयात त्यांच्या दुःखाचे काटे ऋतू लागले.
स्वर्गसुख त्यांना काटेरी वाटू लागले
अनमोल विचार त्यांचे मातीत मिळू लागले
चौकाचौकात फक्त पुतळे उभे राहू लागले…


                               सु-निल